नवी दिल्ली : जगभरात सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे हे तुम्हाला कळले तर तुम्हालाही याचं नवल वाटेल. संयुक्त राष्ट्र या संघटनेनुसार २०१५ मध्ये जवळपास १.६ कोटी भारतीय देशाच्या बाहेर होते. जगभरात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या अधिक आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील विभागाने केलेल्या एका सर्वेनुसार वेगळ्या देशात जन्मलेल्या लोकांची संख्या २०१५ मध्ये २४.२ कोटी होती. जगात भारतीय वंशाच्या लोंकाची संख्या ही सर्वाधिक आहे. जगात भारतीयांची संख्या १.६ कोटी आहे. तर मेक्सिकोतील लोकांची संख्या १.२ कोटी आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासी हे अधिकतर आशिया खंडातील ११ देशातील आहे. युरोपमधील ६ देशांचाही यात समावेश आहे.