नवी दिल्ली : लोकांच्या मदतीसाठी एका कोर्टानं पॉर्न फिल्मचा लिलाव करण्याचा, अजबगजब प्रकार समोर आलाय.
इटलीच्या एका कोर्टानं दोन हजारांपेक्षा जास्त पॉर्न फिल्मसच्या ‘डीव्हीडी’ लिलाव करण्याचा निर्णय सुनावलाय. न्यायालयानं फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी जप्त केलेल्या पॉर्न फिल्मसच्या डीव्हीडींचा लिलाव करण्यात येईल, असं जाहीर केलंय.
या सिनेमांचा लिलाव 24 सप्टेंबर रोजी केला जाईल. कोर्टानं एका डीव्हीडीची किंमत जवळपास 56 हजार रुपये निश्चित केलीय.
ट्रान्सपोर्ट बिझनेसशी निगडित ‘लियुजी कमपेनियो’वर जवळपास 312 करोड रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. न्यायालयानं कंपनीकडून जवळपास 2187 डीव्हीडी शिवाय सेक्ससंबंधित सामानही मोठ्या प्रमाणावर जप्त केलंय.
डीव्हीडी आणि सेक्स संबंधित सामानाशिवाय 400 कार, 70 लॉन्च आणि 160 मोटारसायकलचाही लिलाव होणार आहे. या सामानाचा लिलाव करून न्यायालय फसवणूक झालेल्या जनतेची मदत करणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.