माली अतिरेकी हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू

पश्चिम आफ्रिकेतील माली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनिता दातार या भारतीय वंशाच्या तरुणीचा मृत्यू झाला. अनिता ही अमेरिकेची नागरिक आहे. शांतीदूत म्हणून ती गेल्या काही वर्षांपासून आफ्रिकेत कार्यरत होती. अमेरिकन दूतावासाने अनिताच्या मृत्यूची बातमीला दुजोरा दिलाय.

Updated: Nov 21, 2015, 06:17 PM IST
माली अतिरेकी हल्ल्यात भारतीय महिलेचा मृत्यू title=

माली : पश्चिम आफ्रिकेतील माली येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनिता दातार या भारतीय वंशाच्या तरुणीचा मृत्यू झाला. अनिता ही अमेरिकेची नागरिक आहे. शांतीदूत म्हणून ती गेल्या काही वर्षांपासून आफ्रिकेत कार्यरत होती. अमेरिकन दूतावासाने अनिताच्या मृत्यूची बातमीला दुजोरा दिलाय.

मालीच्या बोमकामधील ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये शुक्रवारी अतिरेक्यांनी हल्ला केला तसेच अनेक नागरिकांना ओलीस ठेवले. ओलीस ठेवलेल्यांपैकी 27 जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. तर 20 भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, इंडोनेशियातील बालीत नागरिकांना ओलिस ठेवणा-या दहशतवाद्याचा मास्टरमाईंट असलेला दहशतवादीचा खात्मा झाल्याची माहिती आहे. मोखत्तार बेलमोखत्तर असं या दहशतवाद्याचं नाव असून अमेरिकेच्या हल्लात तो मारला गेल्याची माहिती आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.