श्रीकांत श्रीनिवासन अमेरिकेचे `टॉप-जज्ज`

भारतीय वंशाचे अमेरिकन न्यायाधीश श्रीकांत श्रीनिवासन यांची अमेरिकेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.

Updated: May 24, 2013, 01:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वॉश्गिंट
भारतीय वंशाचे अमेरिकन न्यायाधीश श्रीकांत श्रीनिवासन यांची अमेरिकेतल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.
यूएस अपिल्स फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किट या कोर्टात ४६ वर्षांचे श्रीनिवासन न्यायदानाचं काम करतील. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना या पदासाठी नॉमिनेट केलं होतं. त्यावर सिनेटनं एकमुखी शिक्कमोर्तब केलं आहे.
९७ मतांनी त्यांची या पदासाठी निवड झाली आहे. अमेरिकेन न्यायसंस्थेत इतक्या मोठ्या पदावर पोहोचणारे श्रीनिवासन हे पहिले दक्षिण आशियाई ठरलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.