भारत चीनला याबाबतीत मागे टाकणार

2022 पर्यंत भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश होऊ शकेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सध्या चीन ह्या देशाची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.

Updated: Jul 30, 2015, 02:02 PM IST
भारत चीनला याबाबतीत मागे टाकणार title=

वॉशिंग्टन : 2022 पर्यंत भारत हा जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश होऊ शकेल, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे. सध्या चीन ह्या देशाची लोकसंख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो.

भारत आणि चीन दोघांची लोकसंख्या एक अब्जच्याही वरती गेली आहे. जगात या दोन्ही देशाची लोकसंख्या 19 टक्के आणि 18 टक्के आहे.

2022 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येपेक्षा पुढे निघून जाऊ शकते, अशी माहिती संयुक्त राष्ट्रद्वारा जाहीर केलेल्या ‘वर्ल्ड पॉपुलेशन प्रोसपेक्ट्स : द 2015 रिवीजन’अहवालात केली आहे. 

सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या जगातील 10 देशांमध्ये नायजेरिया (आफ्रिका) चाही क्रमांक लागतो. चीन भारत इंडोनेशिया, पाकिस्तान, बांग्लादेश हे 5 देश आशियातील आहेत.

यात नायजेरिया या देशाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. अहवालानुसार 2050 पर्यंत सहा देशांची लोकसंख्या 30 कोटीहून अधिक होईल यात चीन, भारत, इंडोनेशिया, नाइजेरिया, पाकिस्तान आणि अमेरिका असे देश आहेत.

जगाची सध्या लोकसंख्या 7.3 अब्ज आहे, तर 2030 पर्यंत ती 8.5 पर्यंत पोहोचेल असे अनुमान या अहवालात दिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.