लंडन : दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 50 वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर 5 लाख 60 हजार वर्ष जुने प्राचीन दात मिळाला आहे. युरोपातील आतापर्यंतचा सर्वात पुरातन अवशेष म्हणून याची गणना केली आहे. दक्षिण-पश्चिम फ्रान्समधल्या टोटावेल या ठिकाणी, हा पुरातन दात मिळाला आहे.
या ठिकाणाहून चार लाख 50 हजार वर्षे पुरातन इमारतीचे अवशेषही हस्तगत करण्यात आले आहे. आठवड्यात अका 16 वर्षीय स्वयंसेवी पुराण वस्तूंचा संग्रह करणाऱ्याला कॉनडी अल अरोगा या गुहेत मिळाला आहे.
या गुहेला सुमारे 50 वर्षे खोदण्याचे काम चालू होते. खोदकाम करत असताना एका युवकाचे मोठा दात मिळाला आहे. हा पुरूषाचा आहे कि महिलेचा हे अजून स्पष्ट झालेले नाही.
हा दात कुठल्या काळातील आहे, याचा शोध लावण्यासाठी विविध पद्धतींचा उपयोग करून पाहिल्यानंतर शोध लागला की, हा दात 5 लाख 60 हजार वर्षे पुरातन आहे. असे वक्तव्य पुरातन अवशेषांची अभ्यासक एमली वॉयलेट दिले आहे.
युरोपमध्ये या काळातील अवशेष खूपचं कमी असल्याने, हा एक खूप मोठा शोध असल्याचे वॉयलेट यांनी सांगितले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.