मुंबई : काहीच दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीला एका मासिकाच्या मुखपृष्ठावर विष्णूरुपात दाखवल्याने वाद उफाळून आला होता. आता याच वादात एका अमेरिकी मासिकाची भर पडली आहे.
अमेरिकी मासिक 'फॉर्च्युन'ने अॅमॅझॉनचे सीईओ जेफ बेझ़ॉस यांना कव्हर फोटोवर विष्णूरुपात दाखवल्याने अमेरिकेतील हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा दावा तेथील हिंदूंनी केला आहे.
यातील विष्णूरुपी जेफ बेझ़ॉस यांच्या डाव्या हातात कमळ तर उजव्या हातावर अॅमॅझॉनचा लोगो आहे. अॅमॅझॉन कंपनीने अगदी अल्प काळात भारतीय बाजारात अगदी भरीव कामगिरी केल्याविषयीच्या कव्हर स्टोरी संदर्भात जेफ बेझ़ॉस यांचं कौतुक करण्यात आलं आहे.
याबद्दल इंटरनेटवर आरडाओरड झाल्यावर फॉर्च्युन मासिकाच्या संपादकांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला किंवा चित्रकाराचा हेतू नसल्याचेही ते म्हणाले.