हिंदू मुलाने इस्लाम स्वीकारला आणि झाला आयसीसचा क्रूरकर्मा

लंडनमधील सिद्धार्थ धर या मुलाने दहा वर्षापूर्वी हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात धर्मांतर केलं. सिद्धार्थला जॉन म्हणतात, धर्मांतरानंतर त्याचं नाव, अबु रूमसा असं आहे. सिद्धार्थ धरच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने मुस्लिम मुलीशी लग्न केल्यानंतर धर्मांतर केलं. 

Updated: Jan 5, 2016, 08:35 PM IST
हिंदू मुलाने इस्लाम स्वीकारला आणि झाला आयसीसचा क्रूरकर्मा title=

लंडन : लंडनमधील सिद्धार्थ धर या मुलाने दहा वर्षापूर्वी हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात धर्मांतर केलं. सिद्धार्थला जॉन म्हणतात, धर्मांतरानंतर त्याचं नाव, अबु रूमसा असं आहे. सिद्धार्थ धरच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने मुस्लिम मुलीशी लग्न केल्यानंतर धर्मांतर केलं. 

सिद्धार्थ धर आता आयसीसीमध्ये दिसून आला आहे. हे सत्य असेल तर मी माझा भाऊ असला तरी त्याला जिवंत सोडणार नाही, असं त्याच्या बहिणीने म्हटलंय, तर त्याच्या आईने देखील त्याच्या या कृत्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 

सिद्धार्थ धर आता ब्रिटीश सरकारच्या रेकॉर्डवरून फरार आहे. तो आता थेट सिरीयात पोहोचला आहे. आयसीसीच्या नव्या व्हिडीओत तो लोकांच्या डोक्यात गोळ्या घालताना दिसतोय. हा युवक आपली पत्नी आणि मुलासह सिरियात दाखल झाला होता.