www.24taas.com, कोलंबस
चंद्रावर पहिल्यांदा आपला पाय रोवणाऱ्या नील आर्मस्ट्रांग यांच्या ह्रद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आलीय. 82 वर्षांचे नील आर्मस्ट्रांग हे शस्त्रक्रियेनंतर सध्या आराम करत आहेत.
नील आर्मस्ट्रांग यांच्यावर नक्की कुठे शस्त्रक्रिया करण्यात आली याबाबत अजून तरी खुलासा झालेला नाही. मात्र, आर्मस्ट्रांग यांच्या पत्नी कारोल यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर नासाच्या प्रवक्त्यानं माजी अंतराळवीर आर्मस्ट्रांग सुखरुप असून सध्या आराम करत असल्याची माहिती दिली. गेल्या रविवारी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस होता. आर्मस्ट्रांग यांनी 83 व्या वर्षात पदार्पण केलंय.
नील आर्मस्ट्रांग यांची तब्येत लवकरात लवकर सुधारावी, अशी मनोकामना नासाचे अध्यक्ष चार्ल्स बोल्डेन यांनी फेसबूकवर केलीय. 20 जुलै 2969 रोजी ‘अपोलो-11’ या अंतराळयानातून आर्मस्ट्रांग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेऊन एक इतिहास घडवला होता. सहकारी एडविन एल्ड्रिन यांच्यासोबत आर्मस्ट्रांग यांनी जवळपास तीन तास चंद्रावर भ्रमण केलं होतं.