लंडन : चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या १००व्या वाढदिवसानिमित्त गूगलकडून त्यांना खास डुडलद्वारे मानवंदना देण्यात आली आहे.
गुगलच्या होमपेजवर अॅब्स्ट्रॅक्ट प्रकारातील चित्राकृती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये गुगलच्या नावातील G,O,O,E ही अक्षरे अॅब्स्ट्रॅक्ट पद्धतीने चितारण्यात आली आहेत.
L या इंग्रजी अक्षरासाठी हुसेन यांच्या उजव्या हाताचा आणि पेंट ब्रशचा वापर केलाय. महाराष्ट्रात जन्मलेल्या एम. एफ. हुसेन हे अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेचे चाहते होते. तसेच त्यांनी महाभारत आणि रामायणाशी संबंधित काढलेल्या चित्रांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
हिंदू देवींची काढलेल्या आक्षेपार्ह चित्रांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. २००६मध्ये त्यांचे निधन झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.