www.24taas.com, लंडन
प्रेयसीसाठी कायपण असं म्हणत, एका प्रियकराने एक आगळं वेगळं गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्याच्या जीवावर बेतलं. स्वतःला गिफ्ट बॉक्समध्ये कोंडून घेऊन प्रेयसीला ते कुरीयरद्वारे पाठविण्याची अजब युक्ती एका प्रियकराने अवलंबली. मात्र कुरीयर उशीरा पोहोचल्याने गिफ्ट बॉक्समध्ये ‘पॅक’ होऊन बसलेला हू सेन गुदमरून बेशुध्द झाला. आग्नेय चीनमधील हू सेन याला प्रेयसीला सरप्राईझ देणे अशाप्रकारे चांगलेच महागात पडले.
हू सेन यांनी स्वतःला बॉक्समध्ये कोंडून घेऊन बॉक्स कुरियर कंपनीला नेण्यास सांगितले. आपल्या एका मित्राला प्रेयसीच्या कार्यालयात जाऊन कुरियरची वाट पहाण्यास सांगितले. मात्र पत्त्यात अदलाबदल झाल्याने कुरियर पोहचण्यास विलंब झाला. जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा हू सेन बेशुध्द स्थितीत आढळला.
त्याच्यावर तातडीने औषधोपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याने बॉक्सला छिंद्रे पाडण्याच प्रयत्न केला. मात्र खोके जाड असल्याने छिद्रे पडली नाहीत.