पाकिस्तानकडून वर्षभराच्या आत दहशतवाद्यांना फाशी

पाकिस्तानमधील पेशावरच्या आर्मी स्कूलवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यात आलंय. पाकिस्तानात दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची शिक्षा देण्यात आली आहे. 

Updated: Dec 2, 2015, 11:04 PM IST
पाकिस्तानकडून वर्षभराच्या आत दहशतवाद्यांना फाशी title=

पेशावर : पाकिस्तानमधील पेशावरच्या आर्मी स्कूलवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यात आलंय. पाकिस्तानात दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची शिक्षा देण्यात आली आहे. 

मौलवी अब्दुस सलाम, हजरात अली, मुजीबूर रहमान आणि साबिल अलियास अशी या दहशतवाद्यांची नावं आहेत.  विशेष आर्मी कोर्टानं या चौघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात पाकिस्तानच्या राष्ट्रपतींकडे गेल्या महिन्यात या चौघांनी दयेचा अर्ज केला होता. 

मात्र तो फेटाळण्यात आला होता. १६ डिसेंबरला पेशावरमधील आर्मी स्कूलवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. त्यात १५० पेक्षा जास्त जण ठार झाले होते. यात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं समावेश होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.