लंडन : एक महिला जी आपल्या पतीला एकनिष्ठ मानत होती तिला अचानक अनेक वर्षांनंतर धक्का बसला आणि समजले की त्याचे आणि तिच्या आईचे शारीरिक संबंध आहे. हे सत्य समोर आल्यावर तिच्या पाय खालची जमीन सरकली. तिने सोशल मीडियावर हे सर्व पोस्ट करून लोकांचे मत मागितले, की तिने काय करायला हवे.
इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार एक महिला आपल्या घरात साफसफाई करत होती. त्यावेळी तिला एक पेनड्राइव्ह मिळाला. चप्पलांच्या रॅकमध्ये ठेवलेला पेन ड्राइव्ह पाहून तिला संशय आला. तिने तो लॅपटॉपला लावून पाहिला. त्यावेळी तिला जबरदस्त धक्का बसला.
या पेन ड्राइव्हमध्ये खूप सारे फोटो होते. त्यात तिचा पती आणि आई शारीरिक संबंध बनविताना दिसत होते. हे पाहून तिला ४४० व्होल्टचा झटका बसला. त्यानंतर तिने सोशल मीडिया साइट रेडीटवर पोस्ट टाकून लोकांचा सल्ला मागितला.
महिलेने लिहिले की, मला एका पेन ड्राइव्ह मिळाला, त्यात खूप सारे फोटो होते. त्यात माझी आई आणि पती सेक्स करताना दिसत आहेत. माझ्या आईने आणि पतीने मला धोका दिला आहे. हे सारे फोटो लग्नापूर्वीचे आहेत, ती ज्या जुन्या घरात राहत होती.
ती लिहिते की मला आता समजले की माझी आई या लग्नामुळे अधिक खुश का होती. महिलेने सांगितले की माझा पती माझ्या आईच्या ऑफिसमध्ये काम करत होता. मला वाटले की त्यांच्यात बॉस आणि ज्युनिअरचे रिलेशन आहे. खरं तर हे होतं की त्यांच्या शारीरिक संबंध होते.
महिलेच्या पोस्टनंतर काही लोकांनी कठोर पाऊल उचलण्यास सांगितले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.