नवी दिल्ली : जगात असे अनेक देश आहेत जेथे काही कायदे विचित्र आहेत. त्यापैकीच एक देश म्हणजे सामोआ. दोन लाख लोकसंख्या असलेला हा बेटवजा देश.
या देशात एक विचित्र कायदा आहे तो म्हणजे नवऱ्याने बायकोचा वाढदिवस विसरता कामा नये देशात बायकोचा वाढदिवस विसरणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. यामागचे कारणही तसेच विचित्र आहे.
नवरा वाढदिवस विसरला म्हणून बायकोने त्याच्यावर हल्ले केल्याच्या अनेक घटना येथे घडल्या. याप्रकरणी अनेक तक्रारी आल्यानंतर हे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे या देशात एखादा नवरा त्याच्या बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याने गुन्हा केले असे मानले जाते. त्यामुळे येथील नवऱ्यांना कायद्याच्या भितीने बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवणे गरजेचे असते.