वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पदाचा कार्यभार सांभाळण्याआधीच ट्रंप यांनी देशातील नागरिकांसमोर त्यांचा १०० दिवसाचा अजेंडा समोर ठेवला आहे. १०० दिवसाच्या या कार्ययोजनेत ट्रंप यांनी व्यापार, ऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा आणि इमिग्रेशन नीती यावर अधिक भर दिला आहे.
ट्रंप यांनी म्हटलं की, ट्रांस पॅसिफिक डीलमधून अमेरिका वेगळा होणार. या डीलमुळे अमेरिकेला नुकसान होण्याची शक्यता आहे. या डीलपेक्षा चांगलं हे आहे की अमेरिकेने द्विपक्षीय संबंधांवर अधिक जोर द्यावा.
ट्रंप यांच्या या घोषणेनंतर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी म्हटलं की, ट्रांस पॅसिफिक पार्टनरशिपला अजून अधिकृत सहमती नाही मिळालेली. पण अमेरिका जर यामध्ये सहभागी नाही झाला तर या पार्टनरशिपला काही अर्थ नाही राहत.
१०० दिवसाची कार्ययोजना सादर करतांना ट्रंप यांनी म्हटलं की, अमेरिकेला महान बनवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी कृतीसंकल्प आहे. ट्रंप यांनी व्हिडिओमधून संदेश देतांना म्हटलं की, त्यांच्यासाठी अमेरिकेचं हित हे सर्वपरी आहे. अमेरिकेला पुढे नेण्यासाठी ते प्रत्येक हवं ते पाऊल उचलतील. अमेरिकेचा फक्त आर्थिक विकासच नाही तर नागरिकांना सुविधा देण्याचा देखील संकल्प आहे.