अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ५ भारतीय वंशाच्या व्यक्ती

फोर्ब्स मॅग्जीनने अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये पाच भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश आहे. या यादीमध्ये एकूण ४०० लोकांची नावे आहेत.

Updated: Oct 9, 2016, 08:52 PM IST
अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ५ भारतीय वंशाच्या व्यक्ती title=

न्यूयॉर्क : फोर्ब्स मॅग्जीनने अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये पाच भारतीय वंशाच्या लोकांचा समावेश आहे. या यादीमध्ये एकूण ४०० लोकांची नावे आहेत.

फोर्ब्सच्या 'अमेरिकेतील २०१६ मधील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स हे मागील २३ वर्षांपासून पहिल्या क्रमांकावर आहे. सिंफनी टेक्नॉलजीचे संस्थापक रमेश वाधवानी, आउटसोर्सिंग फर्म सिनटेल सहसंस्थापक भरत नीरज देसाई, विमान क्षेत्रातील राकेश गंगवाल, उद्यमी जॉन कपूर आणि सिलिकन वॅलीचे गुंतवणूकदार कवितर्क राम श्रीराम यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

वाधवानी हे या यादीत 222 व्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे ३ अरब डॉलरची संपत्ती आहे. 2.5 अरब डॉलरच्या संपत्तीसह देसाई 274 व्या स्थानावर तर 2.2 अरब डॉलरच्या संपत्तीसह गंगवाल हे 321व्या स्थानावर आहे. 2.1 अरब डालरच्या संपत्तीसह कपूरी 335 व्या तर 1.9 अरब डॉलर संपत्तीसह श्रीराम हे 361 व्या स्थानावर आहेत.