न्यू यॉर्क : लष्कराच्या सेवेत असलेले वडिल तब्बल नऊ महिन्यानंतर परतले, आपल्या वडिलांना भेटण्याचा तिचा उत्साह एवढा दांडगा होता की, तिने चक्क मिलिट्रीचे नियमही बाजूला सारले, आणि आपल्या वडिलांची गळा भेट घेतली.
मिलिट्रीची शिस्त तिच्या जगात अजून नाही. मात्र तिच्या बाबांनाही मुलीला गळा भेट घेण्यापासून स्वत:ला रोखता आलं नाही.
कुवैतवरून ट्रेनिंग कॅम्पमधून हे सैनिक नऊ महिन्यानंतर अमेरिकेत परतले आहेत, त्यांच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या दरम्यान या ३ वर्षाच्या मुलीने आपल्या वडिलांना ओळखलं आणि थेट जाऊन अलिंगन दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.