अंकारा येथील बॉम्बस्फोटात ८६ ठार, १८६ जखमी

 तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये रेल्वे स्थानकाबाहेर आज झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात ८६ जणांचा मृत्यू तर १८६ लोक जखमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.

AP | Updated: Oct 10, 2015, 08:08 PM IST
अंकारा येथील बॉम्बस्फोटात ८६ ठार, १८६ जखमी title=

 अंकारा : तुर्कस्तानची राजधानी अंकारामध्ये रेल्वे स्थानकाबाहेर आज झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटात ८६ जणांचा मृत्यू तर १८६ लोक जखमी झाल्याची माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.

शांतता रॅलीसाठी जमलेल्या नागरिकांना लक्ष्य करीत अंकारा स्टेशनजवळ दहशतवाद्यांनी दोन बॉम्बस्फोट घडवून आणले. यामध्ये १८६ लोक जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

अंकारातील प्रमुख रेल्वे स्थानकाबाहेर शांतता मोर्चासाठी नागरिक जमले असताना स्फोट घडवून आणण्यात आला. कुर्दीश दहशतवाही आणि लष्कर यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा निषेध करणे हा या मोर्चामागचा उद्देश होता. मात्र, दहशतवाद्यांनी नागरिकांना लक्ष केले. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने, स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.