अमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे. 

Updated: Dec 8, 2015, 01:37 PM IST
अमेरिकेत मुसलमानांना प्रवेशास बंदी करा - डोनाल्ड ट्रम्प title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत मुस्लीम धर्मीय व्यक्तींना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी खळबळजनक मागणी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. बराक ओबामा यांना अमेरिकेत प्रवेशासाठी धार्मिक निकषांना ठेचण्याची मागणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी वक्तव्याने चांगला वाद रंगला आहे. 

 
ट्रम्प यांच्या वक्तव्याचा अध्यक्षपदाच्या शर्यतीतील इतर उमेदवारांनी विरोध केला आहे. ‘जोपर्यंत अमेरिकेत काय चाललंय याचा शोध देशाचे प्रतिनिधी घेत नाहीत, तोपर्यंत मुस्लिम व्यक्तींना देशात पूर्णपणे बंदी घालावी’ असं ट्रम्प यांनी प्रचारसभेत म्हटलं. ‘प्यू रिसर्च आणि अन्य काही संशोधनांत मुस्लिम लोकसंख्येतील मोठा जनसमुदाय अमेरिकन नागरिकांचा तिरस्कार करतो.’ असे त्यांनी उघड केले आहे. 

 
देशात मुस्लिमांना प्रतिबंध करण्याची आवश्यकता नाही, असं केल्याने कुठलाही फायदा होणार नसून झालंच तर दुष्परिणाम होण्याची शक्यता न्यूजर्सीचे गव्हर्नर आणि अध्यक्षपदाच्या शर्यतीतीतल उमेदवार क्रिस क्रिस्टी यांनी वर्तवली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा मुस्लिम समाजाकडून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.