वाघ, चित्त्यांसह राहते ही तरुणी

नामिबियामध्ये एक तरुणी चक्क वाघ, चित्ता या प्राण्यासोबत बिनधास्त राहते. त्यांच्याशी खेळते. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना?... पण हे खरं आहे. मार्लिसी वॅन डेर मार्वे असे तिचे नाव आहे. ही बिनधास्त मुलगी सहजपणे वाघ, चित्त्यांसोबत रानावनात भटकते.

Updated: Dec 8, 2015, 10:37 AM IST
वाघ, चित्त्यांसह राहते ही तरुणी title=

नामिबिया : नामिबियामध्ये एक तरुणी चक्क वाघ, चित्ता या प्राण्यासोबत बिनधास्त राहते. त्यांच्याशी खेळते. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना?... पण हे खरं आहे. मार्लिसी वॅन डेर मार्वे असे तिचे नाव आहे. ही बिनधास्त मुलगी सहजपणे वाघ, चित्त्यांसोबत रानावनात भटकते.

सोशल साईटसवरही या बिनधास्त मार्लिसीचे व्हिडीओ व्हायरल झालेत. सॅन बुशमन समुदायाच्या जवळ राहत असल्याने तिला बुश गर्ल असे नाव मिळालेय. मार्लिसी गेल्या ३० वर्षांपासून या वन्यजीवांच्या संपर्कात आहे

नामिबियाच्या नॅशनल पार्कामध्ये तिच्या वडिलांचे फार्महाऊस आहे. तिथे नऊहून अधिक चित्ते आहेत. मात्र या चित्त्यांना मार्लिसी घाबरत नाही तर चित्तेच मार्लिसीला घाबरतात. मर्लिसी बिनधानस्तपणे या पार्कात बाईक राईडही करते. यावेळी जर तिच्यावर कोणत्या चित्त्याने हल्ला केला तर तो कसा परतवून लावायचा याचे कसबही तिच्याजवळ आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.