भारतविरोधी चर्चा नको, 'शरीफ' वक्तव्य

 आजपर्यंत पाकिस्तानमधली अनेक नेत्यांनी भारतविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण कधीही त्यांच्यावर काईवाई किंवा त्यांना कधी वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून कोणी रोखलं नाही.

Updated: Dec 19, 2015, 05:25 PM IST
भारतविरोधी चर्चा नको, 'शरीफ' वक्तव्य title=

इस्लामाबाद  :  आजपर्यंत पाकिस्तानमधली अनेक नेत्यांनी भारतविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण कधीही त्यांच्यावर काईवाई किंवा त्यांना कधी वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून कोणी रोखलं नाही.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मात्र पहिल्यांदा त्यांच्या मंत्र्यांना भारताविरोधात वक्तव्य न करण्याची ताकिद दिला आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या दोन्ही देशांमधील शांती वार्तावर काही परिणाम होऊ नये यासाठी पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या काही नेत्यांना ही ताकिद दिली आहे.

'मागील काही गोष्टी पुन्हा उकरून काढण्यापेक्षा असे वक्तव्य करा ज्यामुळे दोघं देशांमधील चर्चेला प्रोत्साहन मिळेल', अशी ताकिद पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्या मंत्रीमंडळ आणि सहकाऱ्यांना दिली आहे.

पंतप्रधान शरीफ भारतासोबतच्या चर्चेबाबत सकारात्कम असल्याची माहिती त्यांच्या एका सहकाऱ्याने दिली आहे. शरीफ आणि सैन्य प्रमुख यांच्यात भारतासोबत शांतीपूर्ण संबंधासाठी एकमत असल्याचंही एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.