पृथ्वीसारख्याच पण चार पटीनं मोठ्या ग्रहाचा शोध!

पृथ्वीशी मिळता जुळता आणखी एक ग्रह शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश मिळालंय. वैज्ञानिकांनी या ग्रहाला 'Wolf 1061c' असं नाव दिलंय. उल्लेखनीय म्हणजे, पृथ्वीप्रमाणे मनुष्याला या ग्रहावर राहण्यासाठी सर्वात अधिक शक्यता आहे.

Updated: Dec 18, 2015, 09:12 PM IST
पृथ्वीसारख्याच पण चार पटीनं मोठ्या ग्रहाचा शोध! title=

नवी दिल्ली : पृथ्वीशी मिळता जुळता आणखी एक ग्रह शोधून काढण्यात वैज्ञानिकांना यश मिळालंय. वैज्ञानिकांनी या ग्रहाला 'Wolf 1061c' असं नाव दिलंय. उल्लेखनीय म्हणजे, पृथ्वीप्रमाणे मनुष्याला या ग्रहावर राहण्यासाठी सर्वात अधिक शक्यता आहे.

ब्रिटिश मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रह आकारानं पृथ्वीहून चार पटीनं मोठा आहे. 'गोल्डिलॉक्स झोन'मध्ये स्थित असल्यामुळे इथं जिवांना राहण्यासाठी अधिक शक्यता निर्माण झाल्यात. 

इथं ना खूप गरमी आहे ना वातावरण खूप थंड आहे. त्यामुळेच, इथलं पाणी द्रव अवस्थेत असण्याची शक्यता आहे. परंतु, इथं अगोदरपासूनच जीवनाचं अस्तित्व नाकारता येत नाही. 

'युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स'च्या वैज्ञानिकांच्या टीमनं या ग्रहासोबतच आणखी तीन ग्रह शोधून काढलेत. जे एका ताऱ्याच्या भोवती फिरताना दिसत आहेत. हा तारा सूर्याप्रमाणे एका जागेवर स्थिर आहे.... परंतु हा तारा आकारानं छोटा आणि थंड आहे.