मॅराडोनाने गर्लफ्रेंडला मारहाण केलेला व्हिडिओ व्हायरल

महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना हा पुन्हा एका नव्या वादात सापडला आहे. मॅराडोनाने त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडला रॉसियो ऑलिवाला हिला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

Updated: Oct 29, 2014, 08:37 PM IST
मॅराडोनाने गर्लफ्रेंडला मारहाण केलेला व्हिडिओ व्हायरल title=

अर्जेंटीना: महान फुटबॉलर डिएगो मॅराडोना हा पुन्हा एका नव्या वादात सापडला आहे. मॅराडोनाने त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडला रॉसियो ऑलिवाला हिला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

 

त्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात मॅराडोना स्वत: मद्याधुंद अवस्थेत गर्लंफ्रेंडच्या थोबाडीत मारताना दिसतोय. हा व्हिडिओ ओलिवाने गुपचुप तिच्या फोनमध्ये रिकॉर्ड केला. एका स्पॅनिश वृत्तपत्रात प्रथम ही बातमी आली. त्यानंतर अर्जेंटीनाच्या एका टि. व्ही. चॅनलवर व्हिडिओ सहित ही बातमी दाखविण्यात आली असून सोशल मीडियावर ही पसरली.      

 

मॅराडोना हा आतापर्यंतचा सर्वात चांगला फुटबॉलर म्हणून ओळखला जातो. पण, तो नेहमी वादात असतो. ओलिवासोबत माझं भांडण तर झालं. पण, मी तिच्यावर हात उचला नाही. मी तिच्या हातातला फोन फेकून दिला. मी महिलांवर कधी हात उचला नाही, असं एका न्यू यॉर्कच्या एका डेली वृत्तपत्रात त्याने म्हटलंय.   

 
व्हिडिओ पाहा - 
 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.