'नासा'च्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण होताच स्फोट

अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'तर्फे स्पेस सेंटरकडे पाठवण्यात येणाऱ्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्यानं नासाच्या या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. 

Updated: Oct 29, 2014, 03:59 PM IST
'नासा'च्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण होताच स्फोट title=

कॅलिफोर्निया: अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'तर्फे स्पेस सेंटरकडे पाठवण्यात येणाऱ्या अंतरिक्ष यानाचा उड्डाण घेताच स्फोट झाल्यानं नासाच्या या अंतराळ मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. 

व्हर्जिना येथील प्रक्षेपण स्थळावर हा अपघात झाला असून उड्डाण घेताच अवघ्या काही मिनिटांत या मानवविरहीत यानाचा मोठ्ठा स्फोट झाला आणि ते जळून खाक झालं.

सहा अंतराळवीरांसाठी सामुग्री घेऊन निघालेलं हे यान १४ मजले उंच होतं. या यानाच्या उड्डाणाची जबाबदारी ऑर्बिटल सायन्स या कंपनीकडे देण्यात आली होती, ज्यासाठी सदर कंपनीसोबत १.९ बिलीयन डॉलर्सचा करारही करण्यात आला होता. 

यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठी वित्तहानी झाली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.