बीजिंग : जगात दररोज काय काय ऐकायला मिळेल, त्याचा नेम नाही. आता नविनच गोष्ट ऐकायला मिळतेय. चीनमध्ये एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि त्याने बायकोलाय घटस्फोट दिलाय.
लॉटरी लागल्याने आनंदीत व्यक्तीने लॉटरीची रक्कम मिळण्याच्या एक दिवस आधी बायकोलाच घटस्फोट दिल्याची घटना घडलेय. याचे वृत्त चीनमधील स्थानिक वृत्तपत्रांने दिलेय.
लिऊ झिआंग चोंगक्विंग यांना ४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची लॉटरी लागली. ही रक्कम त्याला २६ फेब्रुवारीला मिळणार होती. मात्र, २५ फेब्रुवारीला त्याने आपल्या बायकोला घडस्फोट दिला.
लिऊला २६ फेब्रुवारी रोजी पैसे मिळालेत. त्यानंतर पत्नीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने आपला निकाल देताना लिऊ झिआंग चोंगक्विंगला मिळालेल्या लॉटरीच्या रकमेतील १ कोटी १९ लाख ८६ हजार रुपये बायकोला देण्याचे आदेश दिला. आता ही रक्कम पत्नीला सप्टेंबरअखेर मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.