बिजिंग : भारताचं मंगळयान यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावल्यानंतर चीनच्या मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. साईना वीबो या मायक्रोब्लॉगिंग साईटवर भारताच्या या यशाची तुलना चीनशी केली जातेय.
मीन शिहोंग म्हणतायत, भारत आता चीन पेक्षा जास्त अत्याधुनिक आहे, त्यांचे रॉकेट आणखी पुढे गेले आहेत.
कलामाचांगदे यांनी लिहलंय, अखेर भारताचं अभियान मंगळ पोहोचलं, काही महिन्याआधी चीनच्या काही तज्ज्ञांनी त्यांच्या या प्रयत्नांना ही नाकारलं होतं, ही आमची संकुचित मानसिकता होती.
मागे राहिला का चीन?
हेफ़ेई ली यू यांनी लिहलंय, "भारत मंगळावर पोहोचला, असं काहीही नाही की आपण आपल्या देशांत बोंब ठोकावी.
यिंगाती रिशूने लिहलंय, भारताचं यश हे भ्रष्टाचारात फसलेल्या चीनसाठी एक मोठा झटका आहे.
चीनच्या सरकारने याविषयी भारत सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत, चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलंय. संपूर्ण आशिया खंडासाठी ही गर्वाची गोष्ट आहे.
चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटलंय, या संबंधित आम्ही रिपोर्ट पाहिला आहे, मंगळ ग्रहच्या कक्षेत मंगळयानने यशस्वीपणे प्रवेश केला, या बद्दल भारताला खुप साऱ्या शुभेच्छा!.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.