लंडन : दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (इसिस) सोशल मीडियाचा वापर आपले कट्टर विचार आणि जिहाद लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी केला. मग, हा कुणाचं मुंडकं कापण्याचा व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करणं असो किंवा ट्विटरवर हॅशटॅगच्या साहाय्यानं अमेरिकेला धमकी देणं... सोशल मीडियाचा वापर हिंसात्मक विचार पोहचवण्यासाठी करण्यात इसिसनं बऱ्यापैकी यश मिळवलं...
पण, जगभरातील सगळेच मुस्लिम काही ‘इसिस’च्या विचारांवर सहमत नाहीत. अशाच काही मुस्लिमांनीच आता इसिसविरुद्ध मोहीम उघडलीय... तीही याच सोशल नेटवर्किंगची मदत घेत...
ट्विटरवर सध्या एक ट्रेड जोर धरतोय... #NotInMyName (नॉट इन माय नेम – माझ्या नावावर नाही) या हॅशटॅगद्वारे आधुनिक विचारधारांना मानणारे मुस्लिम आपलं म्हणणं ‘इसिस’पर्यंत आणि एकूणच सगळ्या जगापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करताना दिसतायत.
‘इसिस’ सगळ्या इस्लाम धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही... आणि सगळेच इस्लाम धर्मीय ‘इसिस’ला फॉलो करत नाहीत, असा मॅसेज या कॅम्पेनद्वारे पोहचवण्याचा प्रयत्न केला जातोय.
या कॅम्पेनची सुरुवात लंडनची एक संघटना ‘अॅक्टिव्ह चेंज फाऊंडेशन’नं 10 सप्टेंबर रोजी केलीय. या फाऊंडेशनचे अध्यक्ष हनिफ कादिर म्हणतात, ‘निर्दोष लोकांची हत्या कोणत्याही धर्मात योग्य ठरविली जाऊ शकत नाही. इसिसचे दहशतवादी खरे मुसलमान नाहीत... ते इस्लाम धर्मच्या शांती, द्या आणि करुणा या संदेशांना मानत नाहीत... ते तर मानवतेचेच शत्रू म्हणून काम करतायत’.
‘नॉट इन माय नेम’ हे कॅम्पेन सध्या जोर धरतंय... अनेकांनी आपणं मुस्लिम असूनही ‘इसिस’च्या विचारांना मानत नाहीत, असं ठणकाऊन सांगितलंय.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.