चीनचा फतवा, सद्दाम आणि जिहाद सारखे ठेवू नका मुलांची नावे

  शिनजियांग प्रांतात वाढत्या धार्मिक कट्टरतेवर अंकुश लावण्यासाठी चीनने नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी मुस्लिमांना आपल्या मुलांची नावे सद्दाम, जिहाद आणि इस्लाम ठेवण्यावर बंदी घातली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 25, 2017, 07:08 PM IST
 चीनचा फतवा, सद्दाम  आणि जिहाद सारखे ठेवू नका मुलांची नावे title=

बीजिंग :   शिनजियांग प्रांतात वाढत्या धार्मिक कट्टरतेवर अंकुश लावण्यासाठी चीनने नवीन पाऊल उचलले आहे. त्यांनी मुस्लिमांना आपल्या मुलांची नावे सद्दाम, जिहाद आणि इस्लाम ठेवण्यावर बंदी घातली आहे. 

सरकारने ठरवून दिलेली नावे जर मुस्लिमांनी आपल्या मुलांना ठेवली तर त्यांना शाळा प्रवेश मिळणार नाही तर सरकारी लाभही मिळणार नाही. या भागात मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. 

ह्युमन राईट्स वॉचने दिलेल्या माहितीनुसार शिनजियांग प्रांतातील अधिकाऱ्यांनी अनेक इस्लामिक नावांवर बंदी लावली आहे. साधारणतः अशी नावे  जगभरात मुस्लिम नागरिक आपल्या मुलांची ठेवतात. 

रेडिओ फ्री एशियाने एक अधिकारीच्या हवाल्याने सांगितले की, इस्लाम, कुराण, मक्का, जिहाद, इमाम, सद्दाम, हज आणि मदिना नावांवर बंदी घातली आहे.  या नावांची नोंदणी होणार नाही.  नावांची नोंदणी ही शाळेत दाखला किंवा इतर सरकारी सेवा मिळविण्यासाठी आवश्यक असते. हा नवीन उपाय शिनजियांग प्रांतातील दहशतवादाविरोधात उचलले पाऊल मानले जात आहे. 

चीनने या प्रांतातील मुस्लिमांवर असामान्य दाढी वाढविण्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी बुरखा परिधान करण्यावर बंदी घातली होती. या ठिकाणी सुमारे १ कोटी मुस्लिमांची संख्या आहे. या ठिकाणी झालेल्या हिंसाचारात अनेक जण ठार झाले आहेत. याला चीनने इस्लामिक दहशतवाद्यांना जबाबदार ठरविले आहेत.