चीनमध्ये वादळाचा धुमाकूळ, लाखो लोक बेघर

चानहोम या वादळाने चीनच्या झेजियांग तसेच झियांगसू या दोन प्रांतात धुमाकूळ घातला आहे.

Updated: Jul 13, 2015, 02:01 PM IST
चीनमध्ये वादळाचा धुमाकूळ, लाखो लोक बेघर title=

बीजिंग : चानहोम या वादळाने चीनच्या झेजियांग तसेच झियांगसू या दोन प्रांतात धुमाकूळ घातला आहे.

६६ वर्षांनंतर आलेल्या या वादळाचा चीनला जोरदार तडाखा बसला आहे.

या वादळामुळे जवळजवळ ११ लाख लोकांना आपली घरे सोडयला लागली आहेत तर अनेक लोक अजूनही अडकली आहेत.
या प्रांतातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. चीनी सैन्य वादळात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. 

चानहोम हे वादळ शनिवारी चीनच्या दक्षिण समुद्री तटावर येऊन धडकले होते. त्यावेळी १६० किलोमीटर प्रती तास वारे वाहात होते. रविवारी याचा जोर उतरला होता. या राज्यातील रेल्वेसेवा विजेचा प्रवाह खंडीत झाल्याने बंद झाली आहे तर जोरदार पावसामुळे विमानसेवाही बंद ठेवण्यात आली आहे. 

६६ वर्षांपूर्वी १९४९ला अशाच वादळाने चीनमध्ये धुमाकूळ घातला होता. आणि आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
जवळजवळ  ४१० मिलियन डॉलर (अडीज हजार कोटी) एवढे चीनचे नुकसान आतापर्यंत झाले आहे. या वादळाचे तडाखे जपानच्या ओकीनोवाद्विप तसेच तायवॉनला सुद्धा बसले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.