चीनमध्ये बाटलीबंद शुद्ध हवेचीही विक्री, ऑनलाईन विक्रीला विक्रमी प्रतिसाद

येथे शुद्ध हवेची बाटली मिळेल. अजब वाटतंय ना हे ऐकून. पण चीनमध्ये सध्या पर्वतांवरची शुद्ध हवा बाटलीबंद स्वरुपात मिळतेय. या बाटलीबंद हवेची ऑनलाईन विक्री सुरूय. 

Updated: Dec 17, 2015, 01:24 PM IST
चीनमध्ये बाटलीबंद शुद्ध हवेचीही विक्री, ऑनलाईन विक्रीला विक्रमी प्रतिसाद title=

बीजिंग : येथे शुद्ध हवेची बाटली मिळेल. अजब वाटतंय ना हे ऐकून. पण चीनमध्ये सध्या पर्वतांवरची शुद्ध हवा बाटलीबंद स्वरुपात मिळतेय. या बाटलीबंद हवेची ऑनलाईन विक्री सुरूय. 

चीनमधल्या वाढत्या प्रदुषणाचा विचार करून कॅनडातल्या एका कंपनीनं ही शक्कल लढवली आणि पर्वतांवरची शुद्ध हवा बाटलीबंद करून चीनमध्ये विकायला सुरूवात केली. आश्चर्य म्हणजे चीनमधील लोक या हवेची मोठ्या प्रमाणात खरेदीही करतायत. 

व्हायटालिटी एअर या कंपनीन हवेनं भरलेली एक बाटली २८ डॉलर म्हणजे सुमारे १८७० रुपयांना उपल्बध करून दिलीय. आतापर्यंत पाचशेपेक्षा जास्त बाटल्यांची विक्री झालीय. आणखी ७०० बाटल्यांची डिलिव्हरी होणं बाकी आहे हे विशेष. आता ही शुद्ध हवा खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये जणु काही स्पर्धाच सुरू झालीय.