एका तासात 3 हजार किलोमीटर धावणारी रेल्वे

एक अशी रेल्वे असेल, ज्या रेल्वेने तुम्ही तासाला तीन हजार किलोमीटर प्रवास करू शकतात. हा रेल्वेने प्रवास कसा असेल, याची कल्पना आता तरी करता येईल. कारण चीनच्या एका संशोधकाने आपल्या भविष्यासाठी ही योजना तयार केली आहे.

Updated: May 9, 2014, 12:16 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, शांघाई
एक अशी रेल्वे असेल, ज्या रेल्वेने तुम्ही तासाला तीन हजार किलोमीटर प्रवास करू शकतात. हा रेल्वेने प्रवास कसा असेल, याची कल्पना आता तरी करता येईल. कारण चीनच्या एका संशोधकाने आपल्या भविष्यासाठी ही योजना तयार केली आहे.
चीनच्या सिचुआन प्रांतातील चेंगदू शहरातील जिआओँटोंग विद्यापिठातील सहाय्यक प्रोफेसर देंग जिगांग यांनी सर्वात पहिला मॅनेड मेगाथर्मल सुपरकंडक्टिंग मॅग्नेटिक लॅविटेशन लूप तयार केला आहे. शेकडो किलोमीटर वेगाने जाणारी मॅगलेव ट्रेन यापूर्वी त्यांनी बनवली आहे.
जगातली सर्वात जलद रेल्वेगाडी ही शंघाई मॅगलेव ट्रेन आहे, ही ट्रेन 431 किलोमीटर अंतर तासभरात कापते.