पाहिलाय कधी पाठीवर मुंडकं लटकलेला जिवंत माणूस...

आपलं शीर आणि चेहरा शरीराच्या पुढच्या बाजुला असतो किंवा असं म्हणा की तुमचा चेहरा, डोळे, नाक ज्या बाजुला असतं तो भाग शरीराचा पुढचा भाग म्हणून ओळखला जातो... पण, जर धडाच्या मागच्या बाजुला शीर उलटं लटकलेलं असेल तर...

Updated: Sep 3, 2014, 03:04 PM IST
पाहिलाय कधी पाठीवर मुंडकं लटकलेला जिवंत माणूस...   title=

रिओ दि जेनेरिओ : आपलं शीर आणि चेहरा शरीराच्या पुढच्या बाजुला असतो किंवा असं म्हणा की तुमचा चेहरा, डोळे, नाक ज्या बाजुला असतं तो भाग शरीराचा पुढचा भाग म्हणून ओळखला जातो... पण, जर धडाच्या मागच्या बाजुला शीर उलटं लटकलेलं असेल तर...

होय हे खरं आहे... रिओ दि जेनेरिओचा एक व्यक्ती असा आहे ज्याचं शीर गेल्या 37 वर्षांपासून त्याच्या शरीराच्या मागच्या भागावर आणि तेही उलटं लटकलेलं आहे... आणि महत्त्वाचं म्हणजे तो आपली दिनचर्या इतर सामान्य लोकांप्रमाणेच पार पाडतो.  

या उलटं डोकं असलेल्या माणसाला पाहून कदाचित तुम्हाला चक्कर येण्याची वेळ येईल पण या व्यक्तीनं याच उलट डोक्यासहीत आयुष्याची 37 वर्ष घालवलीत... आणि एक सामान्य आणि आनंदी जीवन जगत असल्याचंही तो सांगतो. 

एका इंग्रजी वेबसाईटनं दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या मॉन्टे कार्लोमध्ये क्लॉडिओ वीयरा डी ऑलिवेरा याचा जन्म झाला. ऑलिवेराचं केवळ शीर नाही तर संपूर्ण शरीरच विचित्र पद्धतीने वाढलंय.  

जेव्हा ऑलिवेराचा जन्म झाला तेव्हा त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. डॉक्टरांनी तर ऑलिवेराच्या आईला या बाळाला अन्न पाणी न देता आपली सुटका करून घेण्याचा सल्लाही दिला होता. पण, त्याच्या आईनं मात्र हा सल्ला धुडकावला.

ऑलिवेरा अभ्यासात खूपच हुशार आहे. तो आज एक अकाऊंटन्ट आहे तसंच तो आता एक प्रेरणादायी वक्ता म्हणूनही पुढे आलाय. त्याचं म्हणणं ऐकण्यासाठी आज बड्या-बड्या हस्ती उत्सुक असतात.    

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.