वॉशिंग्टन : जर तुम्ही सुंदरतेसाठी किंवा गोरे होण्यासाठी चेहऱ्याला फेअरनेस क्रिम लावत असाल तर सावधान... तुमच्यासाठी एक वाईट बातमी.... बऱ्याचशा अशा फेअरनेस क्रिममध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाऱ्याचा वापर केला जातो. त्यामुळे तुमच्या सुंदरतेला धोका पोहचू शकतो. तसेच तुमच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींनाही यापासून धोका निर्माण होऊ शकतो, असे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे.
ज्या क्रिममध्ये प्रमाणापेक्षा अधिक पारा आहे, अशा क्रिम आता आम्ही ओऴखू शकतो लवकरात लवकर काही कडक कारवाई करता येईल, या साठी प्रयत्न करीत असल्याचेही वैज्ञानिकांनी सांगितले.
कैलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थनुसार अमेरिकेच्या अशा प्रकारच्या प्रॉडक्टमध्ये पाऱ्याचं प्रमाण जास्त असतं तसंच काही प्रोडक्ड मध्ये तर दोन लाख 10 हजार पीपीएम इतकं खतरनाक प्रमाण दिसून आलेलं आहे.
वैज्ञानिकांचा मतानुसार, जर या प्रॉडक्टचा वापर केला त्यातील पारा हा हाताद्वारे आपल्या जेवणात तसेच लहान मुलांच्या बिछान्यापर्यंत पोहचू शकतो. तसंच यामध्ये असणारे अपायकारक अंश तुमचा किडणीला त्रास देऊ शकतात. यामुऴे तणाव आणि सततची डोके दुःखी यासारखे आजार निर्माण करु शकतात. सौदर्य प्रसाधनातून पारा शोधण्याची प्रकिया शोधण्यासाठी पहिल्यांदा खूप किचकट होती पण आता टोटल रिफ्लेक्शन एक्स-रे फ्लूरोसेंसद्वारे ही प्रक्रिया सोपी झाली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.