मेलबर्न : भारतीय तरूणाने दोन महिलांचा पाठलाग केल्याने त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. एका ३१ वर्षीय भारतीय तरुणाने २०१२ आणि २०१३ मध्ये दोन महिलांचा ‘बॉलिवूड स्टाइल‘ने पाठलाग केल्याप्रकऱणी हा खटला आहे.
या तरुणाचे नाव संदेश बालिगा असे आहे. संदेश बालिगावर बॉलिवूडमधील चित्रपटांच्या त्याच्यावर प्रभाव आहे. महिलांचा असा पाठलाग केल्याने त्याचा उद्देश यशस्वी होईल असे त्याला वाटते, असे न्यायालयात सांगण्यात आले.
बॉलिवूडच्या चित्रपटांमुळे बालिगा याचा असा ग्रह झाला आहे की, तुम्ही पाठलाग करीत राहिलात की ती महिला कालांतराने तुमच्या प्रेमात पडते, असे एबीसी न्यूजच्या वृत्तात म्हटले आहे.
आरोपी बालिगा याने केवळ एकदा भेटल्यानंतर संबंधित महिलांना सतत एसएमएस करणे, कॉल करणे आणि भेटण्याचा प्रयत्न करायला सुरवात केला. अशा प्रकारे पिच्छा पुरविण्याचे थांबविण्याची विनंती त्या महिलांनी केल्यानंतरही तो थांबला नाही.
संबंधित महिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर बालिगा याने आपण त्यांचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले. दरम्यान, तो टास्मानियामध्ये केवळ दोन वर्षे होता, आणि आरोपीच्या वर्तनावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे त्याचे वकील ग्रेग बार्न्स यांनी न्यायालयात बचाव करताना सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.