मैत्रिणीसोबत निर्वस्त्र होऊन बाइकवर जाणाऱ्याला अटक

आपल्या मित्रांसोबत संपूर्ण कपडे काढून बाइक चालवणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक करून तुरूंगात पाठवलंय.  घटना इंग्लंडमधली आहे. आरोपी युवक वेस्ट ऑफ स्कॉटलँड विद्यापीठाचा विद्यार्थी  क्रेवफोर्ड ब्राउन (२४) नं कंबोडियापर्यंत निर्वस्त्र होऊन बाइक चालवली होती. पोलिसांनी तरूणाला तुरूंगात टाकलंय. त्याच्यावर देशाची सुंदर संस्कृती आणि सीमेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 

Updated: Jan 14, 2015, 08:24 PM IST
मैत्रिणीसोबत निर्वस्त्र होऊन बाइकवर जाणाऱ्याला अटक title=

लंडन: आपल्या मित्रांसोबत संपूर्ण कपडे काढून बाइक चालवणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक करून तुरूंगात पाठवलंय.  घटना इंग्लंडमधली आहे. आरोपी युवक वेस्ट ऑफ स्कॉटलँड विद्यापीठाचा विद्यार्थी  क्रेवफोर्ड ब्राउन (२४) नं कंबोडियापर्यंत निर्वस्त्र होऊन बाइक चालवली होती. पोलिसांनी तरूणाला तुरूंगात टाकलंय. त्याच्यावर देशाची सुंदर संस्कृती आणि सीमेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 

डेली मेलनुसार, कंबोडियाचे पोलीस अधिकारी शॉन शोमकोल यांनी सांगितलं की, त्यांनी तिघांना पोलीस स्टेशनबाहेर निर्वस्त्र बाइक नेतांना पाहिलं होतं. त्यानंतर पोलिसांच्या एका टीमनं त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबण्याचे आदेश दिलेत. 

पोलिसांचं म्हणणं आहे की, कपडे अंगावर नसतांना बाइक चालविल्यानं अश्लिलता पसरते. कंबोडियाची संस्कृती आणि तिथले कायदे याचा स्वीकार करत नाही म्हणून आरोपींना अटक करण्यात आली.

याशिवाय सीमा शुल्क न भरता कंबोडियामध्ये त्यांनी प्रवेश केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही परदेशी व्यक्तीला असं करण्यात सूट नाहीय. त्यांना देशाची संस्कृती आणि कायद्याबद्दलही माहिती नाहीय. 

आरोपींचा पाठलाग करणाऱ्या टीमनं त्यांना थांबायला सांगितलं तेव्हा ते थांबले नाही. कारण त्यांना माहिती नव्हतं की ते चूक करत आहेत. हे तिन्ही आरोपी व्हिएतनाम बॉर्डर क्रॉस करणार होते, असा पोलिसांना संशय आहे. पण त्यापूर्वीच त्यांना पकडलं गेलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.