कराची : भारतीय सिनेमाच्या इतिहासात महत्वाची स्थान असलेल्या ब्लॉकब्लस्टर 'शोले' हा पाकिस्तानात प्रदर्शित होतोय. भारतात प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ४० वर्षांनी शुक्रवारी हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित झाला.
पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट हे पूर्वी व्हिसीआरवर दाखविण्यात येत होते. त्यावेळी भारतीय चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये स्थान नव्हते. पण, आता सुमारे ४० वर्षांनी रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' हा चित्रपट कराचीतील न्यूप्लेक्स या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.
जिओ फिल्म्स आणि मंडिवाला एन्टरटेन्मेंट यांनी हा चित्रपट पाकिस्तानमध्ये आता प्रदर्शित केला असून, याचा ग्रँड प्रिमियर ठेवण्यात आला होता. याला पाकिस्तानमध्ये अनेक सेलिब्रेटी उपस्थित होती.
चित्रपट समीक्षक ओमर अलावी यांनी सांगितले, की पाकिस्तानमधील जुन्या आणि नवीन अशा सर्व प्रेक्षकांसाठी 'शोले' चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. दोन पिढ्या एकत्र बसून या एव्हरग्रीन सिनेमाचा थ्रीडीमध्ये मोठ्या पडद्यावर आनंद लुटू शकतील. पाकिस्तानमध्ये 'शोले' चांगली कमाई करेल, असा विश्वास नदीम मंडीवाला यांनी व्यक्त केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.