उस्ताद अमजद अली खान यांची सरोद अखेर सापडली

प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांची गहाळ सरोद अखेर सापडली आहे. उस्ताद अमजद अली खान यांची ही सरोद 45 वर्षे जुनी होती.

Updated: Jul 1, 2014, 08:02 PM IST
उस्ताद अमजद अली खान यांची सरोद अखेर सापडली title=

नवी दिल्ली : प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांची गहाळ सरोद अखेर सापडली आहे. उस्ताद अमजद अली खान यांची ही सरोद 45 वर्षे जुनी होती.

गहाळ झालेली ही सरोद अखेर तीन दिवसानंतर सापडली आहे.

अमजद अली खान हे 28 जून रोजी ब्रिटीश एअरवेजच्या फ्लाईटने लंडनहून भारतात परतत होते, यावेळी ही सरोद गहाळ झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

सरोद गहाळ झाल्याच्या घटनेला दोन दिवस उलटल्यावरही सरोद सापडलेली नव्हती, अखेर तीन दिवसांनी ही सरोद सापडली. ही सरोद सहा कोटी रूपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
अमजद अली खान यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटलं आहे, 'माझ्यासाठी ही सरोद अनमोल असून जीवापेक्षा प्रिय आहे, आणि जीवाची किंमत पैशांनी ठरवता येत नाही,' अशी प्रतिक्रिया उस्ताद अमजद अली खान यांनी दिली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.