सर्जिकल स्ट्राईकचा दणका, पाकिस्तानात लष्कर-सरकारमधला वाद विकोपाला

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तान मुळापासून हादरला आहे.

Updated: Oct 6, 2016, 02:26 PM IST
सर्जिकल स्ट्राईकचा दणका, पाकिस्तानात लष्कर-सरकारमधला वाद विकोपाला title=

इस्लामाबाद : भारताच्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तान मुळापासून हादरला आहे. त्यात आंततराष्ट्रीय स्तरावरही भारतानं पाकिस्तानची जबरदस्त कोंडी केल्यानं आता पाकिस्तानामध्ये लष्कर आणि सत्ताधारी यांच्यातला संघर्ष टोकाला जाताना दिसतोय. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराला दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असून जर तसं झालं नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान एकटा पडेल असा इशाराही दिला आहे.

पाकिस्तानी लष्कारचे प्रमुख जनरल राहिल शरीफ आणि नवाज शरीफ यांचे मतभेद जगजाहिर आहेत. त्यातच राहिल शरीफ हे भारतला आपला मुख्य शत्रू मानतात. अशावेळी भारतानं केलेल्या सर्जिकल हल्लानं पाकमधली सगळीच यंत्रणा हलवून टाकली आहे. चहू बाजूनं आलेल्या संकटानं आता पाकची कोंडी झाल्याचं वृत्त आज तिथलं महत्वाचं वर्तमानपत्र डॉननं पहिल्या पानावर छापलं आहे.