पाकिस्तान हाय हाय! POK मधील जनतेचा उद्रेक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज तिथल्या जनतेनंच पाकिस्तानच्या सरकारविरोधात मोर्चे काढले.

Updated: Oct 6, 2016, 11:37 AM IST
पाकिस्तान हाय हाय! POK मधील जनतेचा उद्रेक title=

मुझ्झफराबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज तिथल्या जनतेनंच पाकिस्तानच्या सरकारविरोधात मोर्चे काढले. पाकिस्तानी सरकारच्या विशेषतः लष्कराच्या मदतीनं नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे कॅम्प चालतात. या कॅम्पला स्थानिकांनी जोरदार विरोध केला आहे.

या कॅम्पमुळे आमचं जगणं धोक्यात आल्याची स्थानिक रहिवाशांची भावना आहे.  मुझ्झफराबाद, कोटील, चिनरी, मिरपूर, गिलगीट, दायमेर, आणि नीलम नदीच्या खोऱ्यात हे मोर्चे काढण्यात आले.

गेल्या आठवड्यात नीलम नदीच्या खोऱ्यात भारतीय लष्करानं सर्जिकल हल्ले करून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. तेव्हापासूनच तिथल्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. अखेर या नाराजीचा उद्रेक झालाय असंच म्हणावं लागणार आहे.