ढाका : बांग्लादेशातील ६७ वर्षीय रेल्वे मंत्री मुजीबुल हक यांनी आपल्यापेक्षा निम्या वयाने लहान असणाऱ्या होनुफा अख्तर या मुलीशी लग्न केले.
होनुफा ही २९ वर्षांची आहे. प्रोथोम ओलो डेली या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार हे लग्न झाले. लग्नसमारंभ बांग्लादेशमधील कोमिला जिल्ह्यात मीरखोला गावात पार पडले.
वृत्तपत्राच्या बातमीनुसार शुक्रवारी लग्न पार पडताना ५,००,००१ टाका (बांग्लादेशी चलन) मैहर म्हणून ही रक्कम देण्यात आली. या लग्नाला काही मंत्री आणि ७०० पाहुणे उपस्थित होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.