कोबानी : (सिरिया) सोशल मीडियावर सध्या रेहाना नावाच्या मुलीचा फोटो मोठ्या प्रमाणात टवीट होतांना दिसतोय. रेहानाचा फोटो रिट्वीट होण्याचं कारण आहे, तिने शंभरपेक्षा अधिक आएएस दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.
इस्लामिक स्टेटला मोठं आव्हान देत, रेहानाने १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांशी फडशा पाडला आहे. सिरियातल्या कोबानी शहरात इस्लामिक स्टेट आणि कुर्द नागरिकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे.
कोबानीमध्ये पत्रकारांना पोहचणं जवळ-जवळ अशक्य आहे. यामुळे अंतर्गत घडामोडी बाहेर येणं कठीण होतं, मात्र आयएसशी टक्कर घेणाऱ्या लढवय्यांची माहिती सोशल मीडियामुळे समोर येतेय.
रेहाना ही देखिल एक लढाऊ मुलगी आहे, फेसबुक आणि ट्वीटरवर रेहानाची वाहवा होतेय. रेहानाच्या वडिलांची दहशतवाद्यांनी हत्या केली. यानंतर रेहानाने हाती शस्त्र घेऊन जवळ-जवळ १०० दहशतवाद्यांना ढगात पाठवलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.