भारत-फ्रान्समध्ये ६० हजार कोटींचा करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत सोमवारी भारत-फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीच्या ६० हजार कोटींच्या  करारावर स्वाक्षरी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले ओलांद आणि पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. तसेच उर्जा, सौरउर्जा, अन्न-सुरक्षा, अणुउर्जा अशा महत्वाच्या मुद्यांवरही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.

Updated: Jan 26, 2016, 12:23 AM IST
भारत-फ्रान्समध्ये ६० हजार कोटींचा करार title=
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत सोमवारी भारत-फ्रान्समध्ये ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीच्या ६० हजार कोटींच्या  करारावर स्वाक्षरी करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या भारत दौ-यावर आलेले ओलांद आणि पंतप्रधान मोदी यांच्या झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्ष-या झाल्या. तसेच उर्जा, सौरउर्जा, अन्न-सुरक्षा, अणुउर्जा अशा महत्वाच्या मुद्यांवरही दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले.
 
फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा झालेला करार आनंदाची गोष्ट असून तो द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल' असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
 
येत्या तीन वर्षांत भारताला पहिले लढाऊ विमान पुरवण्यात येणार असून पुढील सात वर्षांत भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ३६ लढाऊ विमाने दाखल केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पॅरिसला गेले असताना फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने घेण्याच्या प्रस्तावाची घोषणा करण्यात आली होती.