ISISने प्रसिद्ध केला पॅरिस दहशतवादी हल्लेखोरांचा व्हिडीओ

डमॅस्कस : पॅरिस दहशतवादी हल्लेखोरांचा व्हिडीओ समोर आलाय.

Updated: Jan 25, 2016, 05:16 PM IST
ISISने प्रसिद्ध केला पॅरिस दहशतवादी हल्लेखोरांचा व्हिडीओ title=

डमॅस्कस : पॅरिस दहशतवादी हल्लेखोरांचा व्हिडीओ समोर आलाय. आयसिसनं हा नवा व्हिडीओ जारी केलाय. यात आठ दहशतवाद्यांनी पॅरिसवर दहशतवादी हल्ला केल्याचा दावा आयसिसकडून करण्यात आलाय.

तब्बल ७२ दिवसांनंतर पॅरिसच्या गुन्हेगारांचा चेहरा समोर आलाय. या दहशतवादी हल्ल्यात १३० जण ठार झाले होते.  तर नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं.

या व्हिडीओमध्ये पॅरिस हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्देल हामीदसुद्धा पाहायला मिळतोय. इतकंच नाही, तर पॅरिसनंतर आयसिसचं पुढचं टार्गेट ब्रिटन असल्याचा उल्लेखही या व्हिडीओत करण्यात आलाय. 

त्यामुळं आयसिसचं पुढचं लक्ष्य ब्रिटन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.