साना : सौदी अरेबियाने केलेल्या हवाई हल्ल्यात २० भारतीय ठार झाल्याचे वृत्त आहे. येमेनमधील होदेइदाह बंदरावर सौदी अरेबियाने हा हल्ला केला.
या हल्ल्यात १२ शियापंथीय बंडखोर ठार झाल्याचे येमेनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, इंधनाची तस्करी करणाऱ्यांवर हे हल्ले करण्यात आलेत.
दरम्यान, येमेनची राजधानी सानावर सौदीने केलेल्या हल्ल्यात किमान १० जण ठार झाले आहेत. तर हवाई हल्ल्यात किमान २० भारतीय मच्छीमार ठार झाले आहेत.
सानातील अनेक ठिकाणांवर मंगळवारी करण्यात आलेल्या हल्ल्यात पोलीस अकादमी आणि सुरक्षा सेवा मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आले.
सौदीच्या युद्ध विमानांनी भारतीय मच्छीमारांना घेऊन जाणाऱ्या जहाजावर हल्ला केला, त्यामध्ये २२ जण ठार झाले आहेत. मरीब परिसरात बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात अमिरातीचे ४५ सैनिक ठार झाले होते. मंगळवारी जवळपास २० हवाई हल्ले करण्यात आल्याचे बंडखोरांच्या गटाने म्हटले आहे.
मार्च महिन्यांत सौदी अरेबियाने बंडखोरांविरुद्ध हवाई युद्ध पुकारले होते. तर सप्टेंबर महिन्यांत येमेनवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. येमेनकडून या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. सौदीच्या सीमेवरील मुख्यालयावर हल्ले करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.