us election 2016

24 तासात पाकिस्तानला 2 मोठे झटके

गेल्या 24 तासात जगाच्या इतिहासात दोन मोठ्या ऐतिहासिक घटना घडल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा बॉम्ब टाकला की पाकिस्तानसह काळा पैशा असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. तर दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. जगातील या दोन मोठ्या घटनांमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.

Nov 10, 2016, 04:15 PM IST

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष, हिलरी क्लिंटन यांचा पराभव

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारलीये. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष बनलेत. त्यांना २७६ इलेक्टोरल व्होट मिळालेत. 

Nov 9, 2016, 01:15 PM IST

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी ट्रम्प यांचा विजय जवळपास निश्चित

अमेरिकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. 

Nov 9, 2016, 01:02 PM IST

जाणून घ्या कसे निवडले जातात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ?

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीला आता अवघे काही तास उरले आहेत. अशातच संपूर्ण जगात याच गोष्टीची चर्चा आहे की अमेरिकेचा ४५ वा राष्ट्राध्यत्र कोण होणार ? हिलेरी क्लिंटन की डोनाल्ड ट्रंप ? राष्ट्राध्यक्षपदाच्या या शर्यतीत डेमोक्रेटीक पक्षाकडून हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रंप एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. याशिवाय लिबर्टी पक्षाचे गॅरी जॉनसन हे देखील या शर्यतीत आहेत.

Nov 7, 2016, 06:11 PM IST

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतला हायवोल्टेज ड्रामा

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भारतीय निवडणुकीसारखीच एक समानता आहे, ती म्हणजे हायवोल्टेज ड्रामा. सरत्या दिवसागणिक डेमॉक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारातून तेच ठळकपणे दिसून आलं. 

Nov 7, 2016, 05:20 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्‍मेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि डेमोक्रेटिक उम्‍मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.

Oct 26, 2016, 08:47 AM IST

अमेरिका निवडणूक : प्राथमिक फेरीत रिपब्लिकन, डेमोक्रॅट आघाडीला फटका

 अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या प्राथमिक फेरीच्या निवडणुकीत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांना फटका बसलाय. 

Apr 6, 2016, 02:00 PM IST