हाफीज सईदवर कारवाई करा - क्लिंटन

पाकिस्तानात लपून बसलेला आणि 26-11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांच्यावर कारवाईची अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केली आहे.

Updated: May 8, 2012, 03:19 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

 

पाकिस्तानात लपून बसलेला आणि  26-11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद यांच्यावर कारवाईची अपेक्षा अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केली आहे.

 

 

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांच्याबरोबर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पाकमध्ये अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचं केंद्र असल्याचंही हिलरी यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे आता पाकिस्तान काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे. तसेच तेल आयात कमी करण्याचा भारताचा निर्णयही प्रशंसनीय असल्याचं हिलरी यांनी म्हटले आहे. मात्र इराणवर सर्व देशांनी दबाव वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. दोन्ही देशातील आर्थिक संबंध दृढ होतील, अशी ग्वाही कृष्णा यांनी दिली.

 

 

दरम्यान, इराण सातत्याने आंतरराष्ट्रीय मापदंडाचे उल्लंघन करीत आहे. विशेषत: अण्वस्त्र प्रसारबंदीबाबत इराण आपलेच म्हणणे रेटत आहे. इराणने अणुबॉम्ब तयार केल्यास जगाच्या दृष्टीने विनाशक ठरेल. इराणने आपली भूमिका बदलावी म्हणून इराणवर दबाव आणणे गरजेचे आहे, असे आंतरराष्ट्रीय समुदायाला वाटते, असे क्लिंटन यांनी सांगितले.