स्यू की यांच्या पक्षाला चांगले यश

आँग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं आहे. म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी गेली काही दशके त्या लढा देत आहेत. स्यू की यांच्या पक्षाने ४४ जागांवर विजय मिळवला आहे. नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी १९९० साला नंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली.

Updated: Apr 2, 2012, 03:51 PM IST

www.24taas.com, म्यानमार

आँग सान स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीने रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं आहे. म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी यासाठी गेली काही दशके त्या लढा देत आहेत. स्यू की यांच्या पक्षाने ४४ जागांवर विजय मिळवला आहे. नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी १९९० साला नंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली.

नॅशनल लीगच्या यशात सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे म्यानमारच्या राजधानीत त्यांनी चार जागांवर विजय संपादन केला आहे. म्यानमारच्या राजधानीतील बहुसंख्य मतदार हे सरकार कर्मचारी आणि लष्कारातील असून ते लष्करशहांचे पाठबळ लाभलेल्या युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टीला मतदान करतील अशी अपेक्षा होता. पण तसं न होता नॅशनल लीगच्या पारड्यात त्यांनी मतं टाकली.

स्यू की यांच्या विजयामुळे म्यानमारमध्ये मोठे बदल घडतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पाश्चिमात्या राष्ट्रांनी लादेलेल निर्बंध उठवले जाण्याची शक्यता आहे. आर्थिक निर्बंधामुळे म्यानमारची आर्थिक घडी विस्कटली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभलेल्या म्यानमारमध्ये भारत आणि चीन येत्या काळात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.