www.24taas.com, म्यानमार
म्यानमारमधल्या 50 वर्षांच्या लष्करशाहीला टक्कर देत लोकशाही आणि शांततेचा पुरस्कार करणा-या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या आंग सान स्यू की यांनी संसदीय निवडणूकीत ऐतिहासीक विजय मिळवल्याच्या वृत्तानं म्यानमारमध्ये त्यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
विजयानंतर सू की यांच्या हजारो समर्थकांनी सू की यांचं अभिनंदन करत एकच जल्लोष केला. परंतु त्यांच्या विजयाच्या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पार्टीनं पोटनिवडणुकीत 45 जागा जिंकल्याचा दावा केलाय. स्यू की यांच्या विजयामुळं म्यानमरमध्ये नवीन सुधारणावादी सरकार अस्तित्वात येण्याची आशा निर्माण झालीय. या घटनेमुळं पाश्चिमात्य देशांनी घातलेली आर्थिक बंधने उठवली जाण्याची शक्यता आहे.