www.24taas.com, इस्लामाबाद
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना मारण्यासाठी १० कोटी १० लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. जो मुशर्र यांना ठार करेल, त्याला पूर्णपणे सुरक्षा पुरविली जाईल, अशी घोषणा बलूच नॅशनल पक्षाचे अध्यक्ष शाहझैन बुग्टी यांनी एका पत्रकार परिषेदेत जाहील केले.
शाहझैन हे दिवंगत बलूच नेता अकबर बुग्टी यांचे ते नातू आहेत. २००६ मध्ये मुशर्रफ सत्तेवर असताना लष्कराने कोहलू जिल्ह्यातील बलुचिस्तान प्रांतात केलेल्या कारवाईत अकबर यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. मुशर्रफ शेकडो निरपराध लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे. त्यामुळे त्याच्या आगमनानंतर सरकारने जर अटक केली नाही, तर आम्ही फाशीसाठी फास तयार ठेवला आहे, असेही शाहझैन म्हणाले.
२७ ते ३० जानेवारी दरम्यान मुशर्रफ पाकिस्तानात परतणार असल्याचे सांगितले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शाहझैन यांनी पत्रकार परिषद घेतली. शाहझैन यांनी मुशर्रफना मारणाऱ्याला १० लाख रुपये रोख आणि १० कोटीं रूपयांचा बंगला बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. याप्रकारामुळे मुशर्रफ यांच्या जीवाला धोका असल्याने ते पाकिस्तानमध्ये परत येतील का, याचीच चर्चा आहे.