बुडालेल्या जहाजाने केली संशोधकांची ‘चांदी’

अमेरिकेतल्या एका शोध पथकाला समुद्रतळाशी जलसमाधी घेतलेल्या ब्रिटीश जहाजातून प्रचंड प्रमाणात चांदीचा खजिना सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या खजिन्याची किंमत सुमारे १५ कोटी पौडांपर्यंत जाऊ शकते.

Updated: Oct 9, 2011, 01:25 PM IST

सापडला सुमारे १५ कोटी पौंडांचा खजिना

झी २४ तास वेब टीमलंडन

अमेरिकेतल्या एका शोध पथकाला समुद्रतळाशी जलसमाधी घेतलेल्या ब्रिटीश जहाजातून प्रचंड प्रमाणात चांदीचा खजिना सापडला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या खजिन्याची किंमत सुमारे १५ कोटी पौडांपर्यंत जाऊ शकते.

दुसऱ्या महायुध्दाच्या काळात १९४१ साली जर्मनी आणि त्याच्या सहकारी राष्ट्रांनी मित्र राष्ट्रांवर हल्ले करण्यास सुरुवात केली होतीत्या सुमारास एस एस गैरसोप्पानावाचे जहाज कोलकात्त्याहून लंडनला निघाले होते. जर्मनीच्याच एका यू बोटीने अटलांटिक महासागरात हे जहाज बुडवलं.

वाहतूक विभागाने या बुडालेल्या जहाजाचे अवशेष शोधून काढण्याची जबाबदारी 'ओडिसी मरीन' या कंपनीवर सोपवली होती. त्यामुळेमिळालेल्या खजिन्यातील ८० टक्के माल या कंपनीला देण्यात येईल.

हे ‘एस एस गैरसोप्पा’ जहाज १९४०च्या डिसेंबर महिन्यात कोलकात्त्याहून निघाले होते. त्यावेळी या जहाजावर २४० टन चांदीलोखंड आणि चहा इ. माल चढवण्यात आला होता. त्यावेळी हे जहाज ब्रिटीश स्टीम नेव्हिगेशन या कंपनीशी संबंधित होते.